TRENDING:

तुमच्या डोक्यावर का घोंघावतात डास? जाणून घ्या कारण आहे खास!

Last Updated:
सायंकाळच्या वेळी आपल्या डोक्यावर घोंघावणारे डास प्रचंड सतावत असतात. पण हे आपल्या डोक्याभोवतीच का घोंघावतात याचं एक खास कारण आहे.
advertisement
1/5
तुमच्या डोक्यावर का घोंघावतात डास? जाणून घ्या कारण आहे खास!
बऱ्याचदा आपल्या कानाजवळ किंवा डोक्यावर घोंघावणारे डास सतावून सोडतात. पण हे डास डोक्यावर फिरण्यामागं खास कारण आहे. शरीराचा वास आणि कार्बन डायऑक्साइड (CO2) यामुळे हे डास आपल्याकडे आकर्षित होतात. आपल्या त्वचेतून 340 पेक्षा जास्त रासायनिक पदार्थांची निर्मिती होत असते. यातील काही गंध हे डासांना त्यांच्या अन्नाप्रमाणे आकर्षित करतात.
advertisement
2/5
आपल्या घामातील काही रसायनेही डासांना आकर्षित करतात. अगदी 100 फूट अंतरावरूनही डासांना आपला वास येऊ शकतो. विशेषत: माणूस श्वासोच्छवासातून बाहेर टाकणाऱ्या कार्बन डायऑक्साइडची तर डासांना लगेच जाणीव होते. माणसांचा घाम लगेच सुखत नाही. जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो तेव्हा तो लगेच वर जातो. त्यामुळे डास डोक्याभोवती घोंघावतात.
advertisement
3/5
शरीराच्या गंधासह अनेक प्रकारच्या वासांकडे डास आकर्षित होतात. घामाचा वास आणि शरीरातील इतर वास डासांना आकर्षित करू शकतात आणि हा वास डोके आणि शरीराच्या वरच्या भागातच जास्त जाणवू शकतो.
advertisement
4/5
सहसा डास संध्याकाळी आणि रात्री जास्त सक्रिय असतात. बऱ्याचदा ते प्रकाशाच्या स्रोतांकडे आकर्षित होतात. त्यामुळेच जर तुम्ही संध्याकाळी बाहेर असाल आणि जवळपास दिवे असतील तर ते तुमच्या डोक्याभोवती घोंघावत असतात.
advertisement
5/5
तुमच्या डोक्याभोवती डास येऊ नयेत आणि घोंघावण्याचा त्रास होऊ नये म्हणून खास काळजी घ्यावी. त्यासाठी लांब बाह्यांचे कपडे आणि पूर्ण पँट घालावी. तसेच मच्छरदानी लावावी. याशिवाय डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू देऊ न देणे यासारखे उपाय करता येतील. शिवाय आउटडोअर पंखे किंवा सिट्रोनेला मेणबत्त्या वापरल्यानेही डासांना रोखण्यात मदत होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/फोटो गॅलरी/
तुमच्या डोक्यावर का घोंघावतात डास? जाणून घ्या कारण आहे खास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल