TRENDING:

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meeting: राज्याच्या राजकारणातला पॉवरफुल फोटो, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस भेटीचा अर्थ काय?

Last Updated:
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट खास अशीच होती. कारण, एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दोन्ही नेते आज एकाच फ्रेममध्ये पाहण्यास मिळाले.
advertisement
1/6
राज्याच्या राजकारणातला पॉवरफुल फोटो, उद्धव ठाकरे- फडणवीस भेटीचा अर्थ काय?
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट खास अशीच होती. कारण, एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दोन्ही नेते आज एकाच फ्रेममध्ये पाहण्यास मिळाले.
advertisement
2/6
2019 पासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दरी निर्माण झाली होती. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला सामना अवघ्या महाराष्ट्राने पाहिला.
advertisement
3/6
पण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चित्र पालटलं. महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. त्यानंतर आज पहिल्यांदाच सगळा वाद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
advertisement
4/6
विशेष म्हणजे आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये येताच उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि महायुतीच्या नेत्यांवर टिकास्त्र डागलं. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
advertisement
5/6
मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. ठीक आहे आम्ही निवडणुक जिंकू शकलो नाही. ते जिंकले आणि त्याचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे साहाजिकच आहे या सरकारकडून महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
advertisement
6/6
तसंच, जे निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते अनाकलनीय आहेत त्यामुळे जनतेच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आवाज उठवू, अशी भूमिका देखील उद्धव ठाकरे यांनी मांडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Politics/
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meeting: राज्याच्या राजकारणातला पॉवरफुल फोटो, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस भेटीचा अर्थ काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल