पुण्यात 'Blinkit' कडून एक्सपायरी पदार्थांची डिलिव्हरी? विधानसभेत आमदारांचा हल्लाबोल; मंत्र्यांनी दिली कारवाईची मोठी माहिती
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पुण्यातील ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये चक्क मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ ग्राहकांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार इतका गंभीर आहे की, त्याची दखल आता थेट महाराष्ट्र विधानसभेत घेण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
1/9

आजकालच्या धावपळीच्या जगात 10 मिनिटांत घरपोच किराणा देणाऱ्या 'Blinkit' (ब्लिंकिट) सारख्या ॲप्सचा वापर प्रचंड वाढला आहे. "वेळ वाचतोय" म्हणून आपण मोबाईलवर दोन क्लिक करतो आणि दूध, अंडी किंवा नाश्त्याचे पदार्थ मागवतो. पण, पुण्यातून समोर आलेली एक बातमी तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
advertisement
2/9
पुण्यातील ब्लिंकिटच्या स्टोअरमध्ये चक्क मुदत संपलेले (Expired) खाद्यपदार्थ ग्राहकांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार इतका गंभीर आहे की, त्याची दखल आता थेट महाराष्ट्र विधानसभेत घेण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
3/9
पुण्यात 'ब्लिंक इट' (Blinkit) या नामांकित ऑनलाईन डिलिव्हरी कंपनीकडून मुदत संपलेले (Expired) पदार्थ ग्राहकांना पाठवले जात असल्याचा मुद्दा खडकवासलाचे आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांनी विधानसभेत आक्रमकपणे मांडला. या प्रश्नाला उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगत महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
4/9
आमदार भीमराव तापकीर यांचे विधानसभेतील 'ते' गंभीर प्रश्नआमदार भीमराव तापकीर यांनी पुण्यातील नागरिकांच्या तक्रारींचा संदर्भ देत थेट सरकारला धारेवर धरले. त्यांनी उपस्थित केलेले मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते:एक्सपायरी उत्पादनांची विक्री: ब्लिंक इट कंपनी पुणे शहरात मुदत संपलेली उत्पादने विकत आहे किंवा त्याची डिलिव्हरी करत आहे, हा संशय खरा आहे का?अशा गंभीर तक्रारी प्राप्त होऊनही सरकारने काही पाऊल उललं आहे का?ग्राहकांची ही फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडे काही विशेष नियोजन आहे का?
advertisement
5/9
मंत्री नरहरी झिरवाळ यांचे उत्तर, सखोल चौकशीत सत्य आलं समोरतापकीर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारच्या वतीने राबवलेल्या कारवाईचा तपशील मांडला. त्यांनी सांगितले की1. तक्रार मिळताच अन्न आणि औषध विभागाने (FDA) ब्लिंक इट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड, पुणे) येथील कंपनीच्या गोदामाची तपासणी केली. त्या वेळी तिथे प्रत्यक्ष साठ्यात एक्सपायरी डेटच्या वस्तू आढळल्या नाहीत, मात्र इतर काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार कंपनीला सुधारणा नोटीस पाठवण्यात आली.
advertisement
6/9
2. सखोल अभ्यासात 'घोळ' स्पष्ट: तपासणीच्या वेळी जरी साठा सापडला नसला तरी, प्राप्त झालेल्या तक्रारी, उपलब्ध कागदपत्रे आणि कंपनीच्या रेकॉर्डचा (अभिलेख) सखोल अभ्यास केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. कंपनीकडून काही ग्राहकांना एक्सपायरी झालेल्या वस्तूंची डिलिव्हरी करण्यात आली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
advertisement
7/9
3. न्यायालयीन कारवाई सुरू: कंपनीने नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयात (Court) नेण्यात आले आहे. "दोषी कंपनीवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी सभागृहात दिले.
advertisement
8/9
क्विक कॉमर्स कंपन्यांची ही गोदामे (Dark Stores) अनेकदा रहिवासी भागात किंवा कोपऱ्यात असतात, जिथे सामान्य लोकांची नजर जात नाही. अशा वेळी 10 मिनिटांत माल मिळवण्याच्या घाईत आपण तारखा पाहायच्या विसरतो.
advertisement
9/9
काय काळजी घ्यावी?डिलिव्हरी आल्यावर पाकिटाच्या मागची 'Expiry Date' आधी तपासा.जर मुदत संपलेली वस्तू आली, तर केवळ ॲपवर तक्रार करून गप्प बसू नका, तर FSSAI कडे धाव घ्या.कोणत्याही उत्पादनाचे सील तुटलेले किंवा तारखा पुसट असल्यास ते घेऊ नका.आमदार भीमराव तापकीर यांनी उचललेल्या या पावलामुळे पुण्यातील हजारो ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता हे प्रकरण कोर्टात गेल्यामुळे ब्लिंक इट सारख्या कंपन्यांना शिस्त लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यात 'Blinkit' कडून एक्सपायरी पदार्थांची डिलिव्हरी? विधानसभेत आमदारांचा हल्लाबोल; मंत्र्यांनी दिली कारवाईची मोठी माहिती