TRENDING:

Rain Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 4 तास धोक्याचे, हवामान विभागाने दिला इशारा

Last Updated:
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 4 तास धोक्याचा इशारा दिला आहे.
advertisement
1/5
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 4 तास धोक्याचे, हवामान विभागाने दिला इशारा
पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आज (दि. 11) सायंकाळी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
advertisement
2/5
रायगडावर पावसासह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचे ढग दाटले आहे. रायगडसह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/5
विजांच्या कडकडाटासह वादळी वारे 30 ते 40 किमी वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
4/5
नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानात घट झाली असून, सायंकाळी पावसाचं आगमन होत आहे.
advertisement
5/5
महाराष्ट्रातील संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 29 जिल्ह्यांत पुढील आठवडाभर अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Rain Alert : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील 4 तास धोक्याचे, हवामान विभागाने दिला इशारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल