TRENDING:

Weather update : राज्यात गारठा वाढला, शेकोट्या पेटल्या; जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील तापमान

Last Updated:
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात देशभरात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातही आता तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/5
राज्यात गारठा वाढला, शेकोट्या पेटल्या; जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील तापमान
नवी दिल्ली, 15 डिसेंबर : राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि भारताच्या सर्वच उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाक वाढला आहे. मात्र दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये आजही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 डिसेंबरला दक्षिण भारतातील अनेक रांज्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/5
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि गिलगिट -बाल्टिस्तानमध्ये हिमवृष्टीसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
3/5
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात देशभरात तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढणार आहे. उत्तर भारतामध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतासोबतच महाराष्ट्रातही आता तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
4/5
महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास राज्यात पुढील काही दिवस तापमान कोरडं राहणार आहे. राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
5/5
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यात तापमान 15.3 अंश सेल्सिअस इतके आहे. अहमदनगरमध्ये 14.3, परभणी 15.5, उदगिर 15.2, नाशिक 14.2, पुणे 14.0, छत्रपती संभाजीनगर 14.6, बारामती 14.7, महाबळेश्वर 13.5, गोंदिया 13.2, तर नागपुरात तापमान 14.4 अंश सेल्सिअर इतकं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather update : राज्यात गारठा वाढला, शेकोट्या पेटल्या; जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील तापमान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल