मार्केटमध्ये आली जबरदस्त रेंजची Electric Scooter! किंमत फक्त 49,999 रुपये
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
TVS Orbiter V1 इलेक्ट्रिक स्कूटरने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. BaaS स्किममुळे ही खुप परवडणारी ठरते. या स्कूटरच्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/8

TVS Motor Company भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये आपला दबदबा वाढवण्यासाठी TVS Orbiter V1 सादर केली आहे. ही स्कूटर परवडणाऱ्या किंमतीत एक स्मार्ट आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक वाहन शोधणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या स्कूटरची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची BaaS स्किम आहे.
advertisement
2/8
यामुळे Orbiter V1 ची सुरुवाती एक्स-शोरुम किंमत फक्त 49,999 रुपये राहिली आहे. तर बॅटरीसह याची सामान्य किंमत जवळपास 84,500 रुपये (दिल्ली एक्स-शोरुम) आहे. BaaS मॉडल अंतर्गत ग्राहकांना बॅटरीसाठी जवळपास 862 रुपये महिना रेंट द्यावं लागतं. जो 5 वर्षे किंवा 70,000 किमीपर्यंत वॉरंटी आणि हे अमर्यादित वापर देते. चला त्याच्या डिझाइन आणि स्पेसिफिकेशन डिटेल्सवर एक नजर टाकूया.
advertisement
3/8
डिझाइन आणि डायमेंशन : डिझाइनच्या बाबतीत TVS Orbiter V1 खुप मॉडर्न आणि व्यावहारिक आहे. यामध्ये 845mm लांब फ्लॅट सीट दिलेले आहेत. जे रायडर आणि मागे बसलेल्या दोन्हीसाठी आरामदायक प्रवास सुनिश्चित करते. स्कूटरचा फ्रंट लूक खुप प्रीमियम आहे. ज्यामध्ये आकर्षक वायजरसह शानदार LED हेडलँप आणि डीआरएल (DRLs) दिले आहेत.
advertisement
4/8
या व्यतिरिक्त यामध्ये 34-लिटरचं मोठं अंडर-सीट स्टोरेज मिळते. ज्यामध्ये दोन हाफ फेस हेलमेट सहज ठेवले जाऊ शकतात. कमी वजन (101 किग्रा) असल्यामुळे ही शहरातील हेवी ट्रॅफिकमध्येही चालवणे आणि पार्क करणे खुप सोपे होते. हे मार्टियन कॉपर आणि स्टेलर सिल्व्हर सारख्या वायब्रेंट कलर्समध्ये उपलब्ध आहे.
advertisement
5/8
बॅटरी, मोटर आणि रेंज : Orbiter V1 मध्ये 1.8 kWh ची IP-67 रेटेड लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही स्कूटर एकदा फूल चार्ज झाल्यावर 86 किमी (IDC रेंज) चे अंतर कापू शकते. जे शहरी प्रवासासाठी पुरेसे आहे. यामध्ये लावलेली हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर याला 68 किमी/तासांच्या कमाल वेगापर्यंत घेऊन जाते.
advertisement
6/8
चार्जिंग करण्यास वेळ लागू नये म्हणून कंपनीने या स्कूटरला फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ज्यामुळे याच्या बॅटरीला 0 ते 80% पर्यंत चार्ज होण्यास फक्त 2 तास 20 मिनिटांचा कालावधी लागतो. ही स्कूटर दोन रायडिंग मोड्स- Eco आणि Power सह येते. ज्यामुळे हायडर आपल्या गरजेनुसार रेंज किंवा स्पीड निवडू शकतो.
advertisement
7/8
स्पेसिफिकेसन्स आणि फीचर्स : Orbiter V1 एक कलर्ड LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येते. जे TVS SmartXonnect अॅपच्या माध्यमातून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते. याच्या माध्यमातून रायडरला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि मेसेज अलर्ट आणि जियो-फेसिंग सारख्या सुविधा मिळतात.
advertisement
8/8
या व्यतिरिक्त सुरक्षा आणि सुविधेसाठी यामध्ये हिल होल्ड असिस्ट, क्रूझ कंट्रोल आणि पार्किंग असिस्ट सारखे अडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. एकूणच TVS Orbiter V1 कमी किंमत, चांगले स्टोरेज आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीचं एक असं पॅकेज आहे. जे मध्यवर्गीय कुटुंबांना जास्त पसंत येऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
मार्केटमध्ये आली जबरदस्त रेंजची Electric Scooter! किंमत फक्त 49,999 रुपये