Weather Alert: हवामानात मोठे बदल, पुणे, कोल्हापुरात पावसाची उघडीप, सोलापूरचा पारा चढला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाचा जोर ओसरला असून सोलापुरात तापमानात वाढ झाली आहे.
advertisement
1/7

राज्यातील कोकण, घाटमाथा आणि विदर्भात गेल्या काही काळापासून मान्सूनने जोरदार हजेरी लावली. आता पूर्व विदर्भ वगळता राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने उघडीप घेतली असून पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मागील 24 तासात सातारा परिसरामध्ये 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार सुरू आहे. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यातील मान्सूनची तीव्रता कमी झाली असून घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी आहे. मागील 24 तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात 0.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात पुण्यातील कमाल तापमान 30 अंशावर राहील. हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला राहिला. कोल्हापूर परिसरात 6 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहील. तसेच पावसाचा जोर कमी राहून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात 10 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होत आहे. मागील 24 तासात 31.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद सोलापूर मध्ये झाली. असून आज पारा 32 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 24 तासांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यात 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 23 तर किमान तापमान 31 अंश सेल्सिअस इतके राहीले.
advertisement
7/7
सततच्या ढगाळ वातावरणाने आणि अति पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील शेती धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांसह बागायती पिकांची वाढ देखील खुंटली असल्याचे दिसते. आता पावासाने उघडीप दिली असून ढगाळ हवामानामुळे रोगांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: हवामानात मोठे बदल, पुणे, कोल्हापुरात पावसाची उघडीप, सोलापूरचा पारा चढला