Weather Alert : महाराष्ट्रातलं वारं बदललं, पुन्हा हिम लाट येणार? हवामान खात्याचं महत्वाचं अपडेट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात वाढ दिसून येणार असली, तरी पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवणार आहे.
advertisement
1/7

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ हवामानाचा परिणाम किमान तापमानावर झाला असून अनेक भागांत किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमानात वाढ दिसून येणार असली, तरी पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पाहुयात, 4 जानेवारी रोजी राज्यातील हवामान आणि तापमानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागात हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश स्वच्छ राहील, मात्र सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर काहीसा कमी झालेला आहे. पुणे शहरात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. पुण्यात गेले काही दिवस पहाटे धुक्याची चादर कायम असल्याने वाहनचालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.
advertisement
4/7
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही किमान तापमानात वाढ कायम असून थंडीचा प्रभाव काहीसा कमी जाणवणार आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवू शकतो. तर दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असून काही भागांत थंडीचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असली, तरी काही जिल्ह्यांत ढगांची दाटी पाहायला मिळू शकते.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात किमान तापमानात वाढ झाली असली, तरी थंडी पूर्णपणे कमी झालेली नाही. वातावरणात अचानक बदल झाल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पहाटे आणि रात्रीच्या वेळी उबदार कपड्यांचा वापर करावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातलं वारं बदललं, पुन्हा हिम लाट येणार? हवामान खात्याचं महत्वाचं अपडेट