Oral Health : खराब दातांमुळे होऊ शकतो हृदयविकार आणि मधुमेह! डॉक्टरांनी सांगितले वाचण्याचे उपाय..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Oral health and heart relation : दातांची स्वच्छता राखणं खूप जास्त गरजेचं आहे, हे सर्वांना माहित आहे. दात स्वच्छ ठेवणं फक्त ओरल हेल्थसाठीच नाही तर आपल्या हृदयासाठीही गरजेचं आहे. याबद्दल स्वतः डॉक्टरांनीच माहिती दिली आहे.
advertisement
1/7

दात खराब असतील तर आपल्या हृदयावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासोबतच खराब दातांमुळे मधुमेह होण्याचीही हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. त्यांनी दातांची स्वच्छता कशी राखावी याबद्दलही सांगितलं आहे.
advertisement
2/7
दातांच्या आरोग्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे दंत शल्यचिकित्सक डॉ. अवधेश गंगवार यांनी जागरणशी बोलताना सांगितलं की, जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रोज 100 ते 120 रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. सर्वांना दातांच्या काही ना काही समस्या असतात.
advertisement
3/7
डॉक्टरांनी सांगितलं की, बहुतेक रुग्णांना पायोरिया आणि पोकळीचा त्रास, तंबाखूमुळे दात पोकळ होणे आणि दात किडणे अशा समस्या असतात. म्हणूनच संभाव्य गंभीर समस्या टाळण्यासाठी दातांची योग्य वेळी योग्य प्रकारे काळजी घेणं खूप आवश्यक आहे.
advertisement
4/7
ज्येष्ठ दंतवैद्य डॉ. अनुप आर्य यांनीही याबद्दल अधिक माहिती देत सांगितलं की, आपल्या एकूण आरोग्यासाठी ओरल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. हल्ली बहुतांश लोकांना दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाचे संक्रमण असे त्रास होतात.
advertisement
5/7
तुम्ही तोंडाचे आरोग्य संभाळल्यास म्हणजेच दातांची वव्यवस्तित काळजी घेतल्यास तोंडाचे आजार, हृदयविकार, मधुमेह आणि श्वसन संक्रमण असे अनेक त्रास टाळता येऊ शकतात. दात स्वच्छ न ठेवल्यास त्यामध्ये जंत होतात. यामुळे दातांच्या इनॅमलचा थर वितळून कमी होतो आणि दातांमध्ये पोकळी तयार होते.
advertisement
6/7
म्हणूनच दातांची व्यवस्थित काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोनदा दात घासले पाहिजे. रोज दात फ्लॉस करा म्हणजेच दोऱ्याने स्वच्छ करा. गोड पदार्थ कमी खा. त्यासोबतच दूध, दही, चीज असे पदार्थ जास्त खा आणि भरपूर पाणी प्या.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Oral Health : खराब दातांमुळे होऊ शकतो हृदयविकार आणि मधुमेह! डॉक्टरांनी सांगितले वाचण्याचे उपाय..