Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर 2'चं नुसतं वादळ नाही तर त्सुनामी! एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई करत रचला इतिहास
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2 : द रिव्हेंज' या फिल्मने रिलीज होण्याआधीच खूप कमाई केली. रिलीज झाल्यानंतर या फिल्मने रेकॉर्ड मोडत इतिहासच रचला आहे.
advertisement
1/5

'धुरंधर 2' ने पहिल्याच दिवशी 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि एका दिवसात 100 कोटी रुपये कमावणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. पेड प्रीव्ह्यूमुळे मिळालेली प्रसिद्धी आणि चाहत्यांच्या उत्साहाने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 'धुरंधर 2' ने केवळ बॉक्स ऑफिसवर त्सुनामीच निर्माण केली नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीसाठी यशाचा एक नवीन मापदंडही तयार केला आहे.
advertisement
2/5
आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंगचा धुरंधर 2 : द रिव्हेंज हा धुरंधर फिल्मचा पार्ट 2 म्हणजे धुरंधर 2 फिल्म 10 मार्च रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाली. कित्येक दिवसांपासून या फिल्मचं वादळ आहे. रिलीज होण्याआधीच या फिल्मने खूप कमाई केली. रिलीज झाल्यानंतर या फिल्मने रेकॉर्ड मोडत इतिहासच रचला आहे.
advertisement
3/5
18 मार्चला फिल्मचं प्रीव्ह्यू होतं. या प्रिव्ह्यूंनी बॉक्स ऑफिसवर जे वादळ निर्माण केले, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्याच दिवशी संध्याकाळच्या शोमधून देशभरात तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई केली. यापूर्वीचा 2024 सालच्या 'स्त्री 2' च्या नावावर असलेला 10 कोटी रुपयांच्या कमाईचा रेकॉर्ड मोडला. यापेक्षा 4 पट जास्त कमाई केली आहे.
advertisement
4/5
19 मार्चला फिल्म सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज झाली आणि प्रीव्ह्यूचा सर्वाधिक फायदा आहे. 'धुरंधर 2' ने शून्यापासून नव्हे, तर 43 कोटींपासून सुरुवात केली, ज्यामुळे पहिल्याच दिवशी 100 कोटींचा जादुई टप्पा ओलांडला आणि 'धुरंधर 2' ने गुरुवारी बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली.
advertisement
5/5
सॅकनिल्कच्या एका अहवालानुसार, चित्रपटाने देशात पहिल्याच दिवशी 103 कोटींची कमाई केली. जर यात बुधवार संध्याकाळच्या पेड प्रीव्ह्यूची कमाई जोडली, तर चित्रपटाची एकूण पहिल्या दिवसाची कमाई 146 कोटींपर्यंत पोहोचते. बॉलिवूडच्या इतिहासात कोणत्याही चित्रपटाने पहिल्याच दिवशी हा जादुई आकडा गाठलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 Collection : 'धुरंधर 2'चं नुसतं वादळ नाही तर त्सुनामी! एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई करत रचला इतिहास