Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, या 2 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट, शुक्रवारचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोल्हापूर ते पुणे पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7

गेले काही दिवस राज्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून पावसाचा जोर ओसरला आहे. आज 22 ऑगस्ट रोजी रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 28.1 अंश सेल्सिअस राहिला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्‍यता आहे. पुणे घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाची शक्यता असल्याचे दक्षतेचा यलो अलर्ट आयएमडीने दिला आहे.
advertisement
3/7
सातारा परिसरात मागील 24 तासांत 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण परिसरामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. बुधवारी 21 रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोयना नवजा येथे सर्वाधिक 390 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले आहेत. पुढील 24 तासात सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीत घेतली असून पंचगंगा नदीचे पाणी पातळी स्थिरावली आहे. मागील 24 तासात कोल्हापूर परिसरात 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
सोलापूर परिसरात मागील 24 तासात 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 30 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमान 28.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 28 तर कमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील. कोयना आणि वारणा धरण क्षेत्रामध्ये पुढील 24 तासांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काही भागांमध्ये पाऊस कमी होऊन कमाल तापमानात वाढ होताना दिसतेय. तर बहुतांश भागात ऊन सावल्यांच्या खेळासह हलक्या पावसाच्या सरी बरसत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात हवापालट, या 2 जिल्ह्यांना पुन्हा अलर्ट, शुक्रवारचा हवामान अंदाज