Weather Alert: वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा धो धो सुरू, या 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. आजपासून पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. मात्र, हवामान विभागाने आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने उघडीप घेतली आहे. मागील 24 तासात कमाल तापमानाचा पारा 29.6 अंश सेल्सिअस होता. पुढील 24 तासात संपूर्ण पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. हलक्या पावसासह आकाश साधारणपणे ढगाळ राहील.
advertisement
3/7
सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाची उघडीप कायम होती. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. तसेच ढगांच्या गडगडाटासह एक दोन वेळा हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यावेळी कमाल तापमान 29.9 अंश सेल्सिअस राहिले. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहील. कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह एक-दोन वेळा तुरळक पाऊस पडेल.
advertisement
5/7
सोलापूर जिल्हात मागील 24 तासात पावसाची उघडीप राहिली. आता मात्र हवामानात मोठे बदल जाणवण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
6/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आजपासून पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 32 तर कमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या उघडिपीसह तापमानात चढ-उतार सुरू आहेत. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश राहण्याचा, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या सरींचा अंदाज आहे. पुढील 24 तासानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वारं फिरलं, पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा धो धो सुरू, या 2 जिल्ह्यांना यलो अलर्ट