TRENDING:

Weather Alert: बाप्पाच्या निरोपाला पावसाची हजेरी, पश्चिम महाराष्ट्रातील शनिवारचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather alert: अनंत चतुर्दशीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोल्हापूर ते पुणे पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
1/7
बाप्पाच्या निरोपाला पावसाची हजेरी, पश्चिम महाराष्ट्रातील शनिवारचा हवामान अंदाज
गेल्या काही काळात कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. आज 6 सप्टेंबर रोजी उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीला हवामानाची स्थिती काय राहील? जाणून घेऊ.
advertisement
2/7
सातारा जिल्ह्यात मागील 24 तासात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज साताऱ्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. तसेच पुढील 24 तासांसाठी सातारा घाटमाथ्यासह संपूर्ण सातारा परिसरात मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात पावसाची उघडीप राहिली. तसेच कमाल तापमानाचा पारा 27.8 अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील 24 तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित पुणे जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 27 अंशावर स्थिर राहील.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या पावसाची शक्यता नाही. मागील 24 तासात 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमान 27 अंशावर राहील.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या 24 तासात सोलापुरात पावसाचा जोर कमी झाला. तापमानाचा पारा 31 अंशांवर असून आज त्यात 1 अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आज हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. परंतु, कोणताही सतर्कतेचा अलर्ट नाही.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी 0.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानात घट होवून 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात हलक्या पावसासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 29 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असला तरी पश्चिम महाराष्ट्रात वेगळी स्थिती आहे. पुणे घाटमाथा वगळता आज कोणत्याही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा नाही. पुढील काही काळ हवामानाची हीच स्थिती राहण्याची शक्यता असून काही भागात तापमानात वाढ होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: बाप्पाच्या निरोपाला पावसाची हजेरी, पश्चिम महाराष्ट्रातील शनिवारचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल