Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 12 तास महत्त्वाचे! पुन्हा येतेय हिम लाट, IMD नं दिला अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत थंडीला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पुढेच नोंदवले जात आहे.
advertisement
1/7

राज्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण टिकून असल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. तापमानात झालेल्या वाढीमुळे सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा सौम्य स्वरूपाचा राहिला असून, दिवसा मात्र उष्णतेचा प्रभाव वाढलेला दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत थंडीला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पुढेच नोंदवले जात आहे. पाहुयात, 24 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील.
advertisement
2/7
कोकण विभागासह राज्यातील बहुतांश भागांत हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत दिवसभर आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील. पावसाची कोणतीही शक्यता नसून, उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळी सौम्य गारवा आणि दुपारनंतर उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहणार आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत आकाश निरभ्र राहील, तर दुपार किंवा संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील. सकाळी थोडा गारवा आणि दुपारी उष्णता जाणवू शकते.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर निरभ्र आकाश राहील. येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्याने दिवसात उष्णता वाढलेली जाणवू शकते.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही हवामानात फारसा बदल जाणवणार नाही. नाशिक जिल्ह्यात दिवसभर मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नाही. येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहील. दिवस उष्ण तर सकाळी-रात्री सौम्य गारवा जाणवू शकतो.
advertisement
6/7
विदर्भात अंशतः ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये दिवसभर अंशतः ढगाळ आकाश राहील. येथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्री थोडासा गारवा, तर दुपारी उष्णता वाढलेली जाणवू शकते.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यातील हवामानात सतत होत असलेल्या बदलांमुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 12 तास महत्त्वाचे! पुन्हा येतेय हिम लाट, IMD नं दिला अलर्ट