Weather Alert: वादळी वारे अन् विजा कडकडणार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Weather Alert: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
1/7

मागील आठवड्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस झालाय. आता राज्यातील जवळपास सर्वच भागातून पावसाने काढता पाय घेतला आहे. 15 जुलै रोजी राज्यातील सर्वच भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
advertisement
2/7
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. पाहुयात 15 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
15 जुलै रोजी मुंबईत सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस झालाय. आता पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ वातावरण राहून हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोणतीही पावसाची शक्यता नाही. राज्याच्या काही भागांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: वादळी वारे अन् विजा कडकडणार, राज्यातील अनेक जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट