Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाहुयात 13 जुलै रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
1/7

गेल्या तीन दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांतून पावसाने काढता पाय घेतला आहे. 13 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. पाहुयात 13 जुलै रोजी राज्यात हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागात पावसाची तीव्रता कमी झालेली दिसून येत आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा या सर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या सर्व ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक घाटमाथा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही.
advertisement
7/7
राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झालेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता कमी होण्याची शक्यता आहे. तरीही ज्या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, तेथील शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट