TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! पावसाचं पुन्हा कमबॅक, 11 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
राज्यात 14 ऑक्टोबरपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. 14 तारखेला राज्यातील अकरा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! पावसाचं पुन्हा कमबॅक,11 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात 14 ऑक्टोबरपासून पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. 14 तारखेला राज्यातील अकरा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यामध्ये दिवाळीच्या सुमारास पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली होती. दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर सायंकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ होईल. मुंबईतील कमाल तापमान तब्बल 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे राहील. कोकणामध्ये मुख्यतः कोरडे हवामान पाहायला मिळेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी यलो अलर्ट दिला आहे. तर कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाट भाग, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. अहिल्यानगरमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील सर्वाधिक सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यामध्ये पुढील तीन दिवस पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. 14, 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची सुरक्षितता निश्चित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! पावसाचं पुन्हा कमबॅक, 11 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल