TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात गुरुवारी तुफान पावसाची एंट्री, 16 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
11 सप्टेंबर रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
महाराष्ट्रात गुरुवारी तुफान पावसाची एंट्री, 16 जिल्ह्यांना अलर्ट
राज्यातील काही भागांत पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. तर काही भागांत अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक भागांत स्वच्छ सूर्यप्रकाश बघायला मिळत आहे. कमाल तापमानात देखील वाढ बघायला मिळत आहे. 11 सप्टेंबर रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात, 11 सप्टेंबर रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण आणि मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगरमधील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिकमधील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. नागपूरमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
11 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकूण 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांतील तापमानात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात गुरुवारी तुफान पावसाची एंट्री, 16 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल