TRENDING:

Weather Alert: पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी चिंतेचे! पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
28 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पाहुयात 28 तारखेला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7
पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी चिंतेचे! पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
2/7
28 ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पाहुयात 28 तारखेला राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
3/7
मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
4/7
पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या गडगडाटासह आणि ताशी 30 ते 40 किमी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता या भागात आहे.
advertisement
5/7
तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार तर संभाजीनगर, बीड, हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
7/7
विदर्भात सर्व 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात मुसळधार तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी चिंतेचे! पुन्हा मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल