TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं तुफानी कमबॅक, जोरदार बरसणार, 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
तब्बल 29 जिल्ह्यांना 28 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं तुफानी कमबॅक, जोरदार बरसणार,29 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यातील तब्बल 29 जिल्ह्यांना 28 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाशासह सायंकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात सर्व जिल्ह्यांना 28 तारखेसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट तर सांगली आणि सोलापूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आगामी तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित सहा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
6/7
तर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भात आणि मराठवाड्यात तर अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा यामुळे मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं तुफानी कमबॅक, जोरदार बरसणार, 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल