Weather Alert: तुफान आलंया! गुरुवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
16 ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
1/7

पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यामध्ये 15, 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील तब्बल 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस एवढे असेल. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार वगळता धुळे, नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
5/7
मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भामध्ये मात्र प्रामुख्याने कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. नागपूर, अमरावती सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळेल, तर किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल.
advertisement
7/7
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली आहे, परंतु वातावरणीय बदलांमुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील जालना शहरात दुपारच्या वेळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: तुफान आलंया! गुरुवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळणार, 13 जिल्ह्यांना अलर्ट