TRENDING:

Weather Alret : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! हिम लाट धडकणार, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
राज्यात ढगाळ वातावरणासह काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. विशेषतः विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून काही ठिकाणी किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. 
advertisement
1/7
महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! हिम लाट धडकणार, हवामान खात्याचा अलर्ट
राज्यात ढगाळ वातावरणासह काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावल्याने किमान तापमानात पुन्हा घट झाली आहे. विशेषतः विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला असून काही ठिकाणी किमान तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने थंडीची लाट जाणवू लागली आहे. पाहुयात, 8 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहणार आहे.
advertisement
2/7
कोकण विभागात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत धुक्याची स्थिती जाणवू शकते, तर दिवसभर अंशतः ढगाळ आकाश राहील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर तुलनेने कमी असला तरी पहाटे गारवा जाणवणार आहे. पुणे शहरात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. पहाटे धुक्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. परिसरातील इतर जिल्ह्यांतही अशीच हवामान स्थिती राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
मराठवाडा विभागात सकाळी धुके आणि नंतर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं राहील. किमान तापमानात फारशी घसरण नसल्याने थंडीचा प्रभाव मर्यादित राहणार आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातही सकाळच्या वेळेत धुके दिसून येण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पहाटे गारवा जाणवेल, मात्र दिवसा हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र झाला आहे. नागपूर येथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळेत धुके राहील, त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र होईल. गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावतीसह काही भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने गारठा वाढला आहे.
advertisement
7/7
राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण कायम असून पहाटे दाट धुके आणि दव पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गारठा पुन्हा वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. तापमानातील चढ-उतारामुळे सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alret : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! हिम लाट धडकणार, हवामान खात्याचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल