Weather Alert : महाराष्ट्र गारठला! मंगळवारी थंडीची लाट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळी हलकी थंडी जाणवत आहे. पाहुयात 11 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7

राज्यात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर सगळीकडे निरभ्र आकाश पाहायला मिळत आहे. तर किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळी हलकी थंडी जाणवत आहे. पाहुयात 11 नोव्हेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः निरभ्र राहील. तर कमाल तापमानात वाढ होईल. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही याच प्रकारचे हवामान पाहायला मिळेल.
advertisement
3/7
पुणेकरांना देखील गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील किमान तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत देखील तापमानाची स्थिती अशीच राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात गारठा सर्वात जास्त आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. 11 नोव्हेंबर रोजी देखील उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मराठवाड्यात देखील शीत लहर पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळाले. 11 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील तापमानात 1 अंशाने वाढ होऊ शकते.
advertisement
6/7
तर विदर्भात देखील किमान तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. यामुळे गारठा वाढला असून नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विदर्भात किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
7/7
दरम्यान 15 नोव्हेंबर नंतर राज्यातील हवामानात बदल होणार आहे. किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्र गारठला! मंगळवारी थंडीची लाट येणार, हवामान खात्याकडून अलर्ट