Weather Alert : पुढील 24 महत्त्वाचे, महाराष्ट्रात अचानक हवामान बदल, IMD नं दिला अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून राज्यातील बहुतांश भागांत तापमान 10 अंशांच्या पुढे नोंदवण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण टिकून राहणार आहे. तरीही थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

राज्यात सध्या ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढल्याने थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्याचं चित्र आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान कायम असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरीही कोसळत आहेत. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली असून राज्यातील बहुतांश भागांत तापमान 10 अंशांच्या पुढे नोंदवण्यात आलं आहे. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण टिकून राहणार आहे. तरीही थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. पाहुयात 14 जानेवारी रोजी राज्यात तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागात हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसभर वातावरणांत दमटपणा जाणवू शकतो.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पहाटेच्या वेळेत थंडी जाणवेल. पुणे शहरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपार किंवा संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहील. पुण्यासह सातारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात सकाळी थंड वातावरण राहील, त्यानंतर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे. बीड आणि जालना जिल्ह्यांतही साधारण अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा काहीसा कमी झाला आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रात पहाटे गारवा जाणवेल. नाशिकमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं राहील. काही भागांत सकाळच्या वेळेत धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
6/7
विदर्भात थंडीचा प्रभाव कायम असला, तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. नागपूर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतकं राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र सकाळच्या वेळेत गारवा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यभरात तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार असून बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : पुढील 24 महत्त्वाचे, महाराष्ट्रात अचानक हवामान बदल, IMD नं दिला अलर्ट