Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, आता येणार नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे राज्यात संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत.
advertisement
1/7

राज्यात सध्या तापमानात चढ-उतार सुरूच असून, थंडीचा प्रभाव काहीसा कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. काही भागांत सकाळी धुके, तर दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे.
advertisement
2/7
उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे राज्यात संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. पुढील काही दिवसही अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाहुयात, 29 जानेवारी रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
3/7
कोकण विभागात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहणार आहे. मुंबई आणि परिसरात आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता असून, पावसाचा कोणताही अंदाज नाही. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
पश्चिम महाराष्ट्रात सकाळच्या वेळेत थंडावा जाणवणार असून, काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरात सकाळी धुके, त्यानंतर दिवसभर कोरडे आणि स्वच्छ हवामान राहील. येथे कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
5/7
मराठवाडा विभागात हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी हलका गारवा जाणवू शकतो. येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
6/7
उत्तर महाराष्ट्रात हवामानात काहीसा बदल दिसून येत आहे. नाशिकसह काही भागांत ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. मात्र पुढील तासांत हवामान प्रामुख्याने स्थिर राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
7/7
विदर्भात सकाळी हवामान आल्हाददायक राहणार असून, दिवसभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 30 अंश, तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णतेचा अनुभव येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा बदलली हवा, आता येणार नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट