TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, शुक्रवारी दुहेरी संकट, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातून पावसाचे सावट दूर झाले आहे. राज्यामध्ये 7 नोव्हेंबर रोजी हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
1/7
महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, शुक्रवारी दुहेरी संकट, हवामान विभागाचा अलर्ट
दक्षिण कोकण आणि दक्षिणमध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातून पावसाचे सावट दूर झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये 7 नोव्हेंबर रोजी हवामान कसे असेल पाहुयात.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात 7 नोव्हेंबर रोजी अंशतः ढगाळ हवामान राहील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश एवढे राहील. कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
पुण्यामध्ये सकाळी दुपारनंतर ढगाळ आकाश होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढ्या जाण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता असून थंडीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोल्हापूरमध्ये 7 नोव्हेंबर रोजी तुरळक पाऊस वगळता स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडे हवामान पाहायला मिळेल. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील हवामान स्वच्छ होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये 7 नोव्हेंबर रोजी स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळेल. कमाल तापमान 30 तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आता स्वच्छ वातावरण होण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरडे हवामान पाहायला मिळेल तर कमाल तापमान 30 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
6/7
विदर्भातील किमान तापमानात घट होणार आहे. यामुळे थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे तर आकाश साधारणपणे ढगाळ जाणार आहे. अमरावतीमध्ये ही किमान तापमान 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार आहे तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस एवढे राहील.
advertisement
7/7
एकंदरीत राज्यातून पावसाने निरोप घेतला असून आता गुलाबी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप देताच, रात्रीच्या वेळी थंडी वाजण्यास सुरुवात झाली आहे. तर दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र दमट हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, शुक्रवारी दुहेरी संकट, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल