TRENDING:

Weather Alert : आता पावसाची एक्झिट, पण येणार थंडीची लाट; हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यभरात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता पूर्णपणे थांबला आहे
advertisement
1/7
आता पावसाची एक्झिट, पण येणार थंडीची लाट; हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यभरात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता पूर्णपणे थांबला आहे. 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांत दिवसभर उन्हाची तीव्रता कायम राहील, तर काही ठिकाणी रात्री आणि सकाळच्या वेळी वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. पाहुयात, 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 8 नोव्हेंबरला आकाश स्वच्छ राहणार आहे. या भागांत कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 22 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरातही कोरडे वातावरण राहणार आहे. दिवसभर ऊन आणि रात्री गारवा अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांतही कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतसुद्धा कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाची शक्यता नाही. सर्वत्र कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूरमधील कमाल तापमान 30 अंशांच्या आसपास तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असू शकते.
advertisement
7/7
राज्यातून पावसाने पूर्णपणे निरोप घेतला असून, हवेत सौम्य गारवा आणि रात्रीच्या वेळेस थंडीची चाहूल वाढू लागली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : आता पावसाची एक्झिट, पण येणार थंडीची लाट; हवामान खात्याकडून महत्त्वाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल