Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, आता 'तो' परत येतोय, हवामान खात्याकडून अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाराष्ट्रात देखील पहायला मिळत असून काही भागांत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पाहुयात 13 जानेवारी रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
1/7

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील पहायला मिळत असून काही भागांत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. यामुळे तापमानात वाढ होऊन थंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पाहुयात 13 जानेवारी रोजी राज्यात हवामान कसं असेल.
advertisement
2/7
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 30-32 अंश सेल्सिअस आणि किमान 18-22 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. हलक्या सरींची फारशी शक्यता नाही, मात्र सकाळी हलके धुके पडू शकते. मुंबईत दिवसभर कोरडे आणि आल्हाददायक हवामान अनुभवायला मिळेल.
advertisement
3/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात सकाळी थंडी आणि धुके जाणवेल. कमाल तापमान 28-31 अंश सेल्सिअस आणि किमान 12-16 अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली परिसर 12-13 जानेवारीदरम्यान हलक्या पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडी काहीशी कमी होऊ शकते.
advertisement
4/7
नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये थंडीचा जोर जास्त राहील. किमान तापमान 10-14 अंशांच्या आसपास असेल, तर कमाल 28-30 अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः स्वच्छ ते ढगाळ राहील. सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते.
advertisement
5/7
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी आणि धाराशिव भागात थंडी कायम राहील. किमान तापमान 10-14 अंश, कमाल 29-31 अंश राहील. हवामान कोरडे राहण्याची शक्यता जास्त आहे, मात्र काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. सकाळी धुके आणि थंड वारे जाणवतील.
advertisement
6/7
नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत थंडीचा कडाका अधिक तीव्र असेल. किमान तापमान 8-12 अंश राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान 27-30 अंश राहील. सकाळी दाट धुके आणि थंड वारे वाहतील. काही भागांत कोल्ड वेव्ह सारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
7/7
एकंदरीत, राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहील, मात्र दक्षिणेकडील भागांत हलक्या पावसामुळे तापमानात थोडी वाढ होऊ शकते. शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी सकाळी उबदार कपडे घालावेत आणि सावधगिरी बाळगावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात वारं फिरलं, आता 'तो' परत येतोय, हवामान खात्याकडून अलर्ट