TRENDING:

Weather Alert: मोठा दिलासा! राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:
हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागातील जोरदार पावसाचा जोर ओसरणारआहे.
advertisement
1/5
मोठा दिलासा! राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, पंजाबराव डख यांनी दिली माहिती
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकरी बांधवांना दिलासा देणारा एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या राज्यात अनेक भागातील जोरदार पावसाचा जोर ओसरणारआहे. आज 29 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाल्याचे पाहिला मिळाले.
advertisement
2/5
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे, पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. 30 सप्टेंबर, 1, 2 आणि 3 ऑक्टोबर या चार दिवसांदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगले सूर्यदर्शन होईल आणि हवामान कोरडे राहणार आहे.
advertisement
3/5
ही पावसाची एक मोठी आणि महत्त्वपूर्ण विश्रांती असणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले आहे, त्यांनी या कोरड्या हवामानाचा फायदा घेऊन 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या वेळेत काढणीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.
advertisement
4/5
तथापि ही विश्रांती कायमस्वरूपी नसून 4 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. 4, 5, 6 आणि 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होईल. पावसाची सुरुवात 4 ऑक्टोबर रोजी विदर्भातून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम होईल. त्यानंतर 5 ऑक्टोबरला तो मराठवाड्याकडे सरकेल आणि 5, 6, 7 ऑक्टोबर दरम्यान मुंबई, पुणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्राकडे जाईल.
advertisement
5/5
या पावसाचा वेगही सध्याच्या पावसाप्रमाणेच मुसळधार राहण्याची शक्यता आहे. मात्र, 8 ऑक्टोबर पासून राज्यात परत सूर्यदर्शन होईल आणि या हंगामातील पाऊस राज्यातून पूर्णपणे निघून जाईल आशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: मोठा दिलासा! राज्यातील पावसाचा जोर ओसरणार, पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल