वॉशिंग्टन सुंदर संपूर्ण सिरीजमधून बाहेर
वॉशिंग्टन सुंदर याला या दुखापतीमुळे संपूर्ण सिरीजमधून बाहेर काढण्यात आले असून, त्याच्या जागी निवड समितीने आयुष बदोनी याला पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये स्थान दिले आहे. बदोनी आता राजकोट येथे होणाऱ्या दुसऱ्या मॅचपूर्वी टीमसोबत जोडला जाईल. सुंदरच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याची शक्यता असून, त्याला पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्कॅनिंगसाठी पाठवण्यात आले आहे.
advertisement
आयुष बदोनीची एन्ट्री
दुलीप ट्रॉफीतील क्वार्टर फायनलच्या सामन्यात फलंदाजी करताना आयुष बदोनीच्या दमदार फलंदाजीची जादू पाहायला मिळाली होती. ईस्ट झोनविरूद्ध फलंदाजी करताना त्याने दमदार द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर देखील तो आक्रमक फलंदाजी करत होता. अशातच आता बीसीसीआयने त्याला उर्वरित दोन वनडे सामन्यांसाठी बोलवलंय. टीम मॅनेजमेंट उर्वरित खेळाडूंना दुखापतग्रस्त होण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं देखील बोललं जातंय.
नितीश कुमार रेड्डीला संधी मिळणार?
कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात आता अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या स्क्वॉडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डी यालाही संधी मिळाली असून, श्रेयस अय्यरकडे व्हाईस कॅप्टनसीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय टीमचा अपडेटेड स्क्वॉड: शुभमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (व्हाईस कॅप्टन), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि आयुष बदोनी.
