छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी जिजाऊ यांचे पोर्ट्रेट फोटो साकारण्यात आला आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी अशाच अनोख्या पद्धतीने जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ज्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत त्याच्यापासून जिजाऊ यांची मोठी प्रतिमा तयार करण्यात आली होती. यावर्षीचे जे बॅनर असतात जे काही उपयोगात येत नाही त्याच्यापासून हा मोठा पोट्रेट फोटो तयार केलेला आहे. साधारणपणे आठ दिवस एवढा कालावधी यासाठी लागलेला आहे. 20 बाय 30 फुटाचा पोट्रेट फोटो तयार केला आहे.
advertisement
विविध रंग भरून ही भव्य प्रतिमा तयार केली आहे. शहरातील सर्व तरुणांनी यासाठी आम्हाला मोठी मदत केलेली आहे. त्यासोबत आम्ही सकाळी यासाठी मोठी रॅली देखील काढलेली होती. अशा पद्धतीने आम्ही हे साकारलेलं आहे. पुढच्या वर्षी देखील आम्ही असाच नावीन्यपूर्ण उपक्रम करणार आहोत, असं ज्योतीराम पाटील यांनी सांगितलं आहे.