संक्रांतीची खरेदी करा एकाच ठिकाणी...
मकर संक्रांतीला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. महिलांची संक्रांतीसाठीची खरेदी अजून बाकी असेल, तर आज संध्याकाळपर्यंत या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. येथे संक्रांतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात 200 रुपयांपासून विविध वस्तू उपलब्ध असून साड्या, ज्वेलरी, हॅन्डमेड वस्तू तसेच संक्रांतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करता येणार आहे. 200 रुपयांपासून ते 25 हजार रुपयांपर्यंतच्या वस्तू येथे उपलब्ध असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
हे प्रदर्शन सिटी बँक पेठेतील म्हात्रे पुलाजवळ आयोजित करण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत खुले राहणार आहे. या ठिकाणी स्थानिक तसेच बाहेरील व्यापाऱ्यांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले असून संक्रांतीसाठी लागणाऱ्या पारंपरिक आणि आधुनिक वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. महिलांसह कुटुंबीयांसाठीही येथे खरेदीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.





