TRENDING:

मोठं संकट येणार… घराबाहेर 'हे' पक्षी दिसले तर अनर्थ घडणार, चुकूनही करू नका 'या' इशाऱ्यांकडे दुर्लक्ष!

Last Updated:
आपल्या सभोवतालचा निसर्ग आणि प्राणी-पक्षी केवळ पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ते भविष्यातील घटनांचे संकेतही देतात, असा दावा शकुन शास्त्र करते.
advertisement
1/7
घराबाहेर 'हे' पक्षी दिसले तर अनर्थ घडणार, चुकूनही करू नका दुर्लक्ष
आपल्या सभोवतालचा निसर्ग आणि प्राणी-पक्षी केवळ पर्यावरणाचा भाग नाहीत, तर ते भविष्यातील घटनांचे संकेतही देतात, असा दावा शकुन शास्त्र करते. काही पक्षी घराबाहेर येणे हे अत्यंत शुभ मानले जाते, तर काही पक्ष्यांचे आगमन किंवा त्यांचे ओरडणे एखाद्या 'अशुभ' घटनेची चाहूल असू शकते.
advertisement
2/7
घार: शकुन शास्त्रानुसार, घार हा पक्षी परलोक आणि मृत आत्म्यांशी जोडला जातो. जर घराच्या छतावर वारंवार घार येऊन बसत असेल किंवा घार तुमच्या डोक्यावरून वारंवार घिरट्या घालत असेल, तर ते पितृदोषाचे लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न नाहीत किंवा घरात एखादे मोठे संकट येऊ शकते.
advertisement
3/7
मोठ्या संख्येने कावळे: कावळ्याला पितरांचा दूत मानले जाते. मात्र, जर अचानक तुमच्या घराच्या छतावर किंवा घराजवळ मोठ्या संख्येने कावळे जमा झाले आणि कर्कश आवाजात ओरडू लागले, तर ते एखाद्या मोठ्या संकटाचे किंवा अपघाताचे सूचक असते. सामूहिक रितीने कावळ्यांचे ओरडणे हे त्या भागावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेतही असू शकतात.
advertisement
4/7
वटवाघूळ: वास्तुशास्त्रानुसार, वटवाघूळ घरात येणे किंवा घराबाहेरच्या झाडावर वटवाघळांचे वास्तव्य असणे अत्यंत अशुभ आहे. हे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात पैशांची चणचण, आजारपण किंवा कौटुंबिक कलह वाढण्याची शक्यता असते. वटवाघळांचे आगमन हे भाग्यात अडथळे निर्माण करते.
advertisement
5/7
टिटवी: टिटवी हा पक्षी जर घराच्या छतावर बसून रात्रीच्या वेळी ओरडत असेल, तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. ग्रामीण भागात असे मानले जाते की, टिटवीचे ओरडणे हे मृत्यूचे किंवा घरावरील मोठ्या संकटाचे संकेत आहेत. हा पक्षी घराच्या छतावर अंडी घालणे देखील अशुभ मानले जाते.
advertisement
6/7
गिधाड: गिधाड हा पक्षी सहसा वस्तीत दिसत नाही, पण जर तो तुमच्या घराच्या छतावर येऊन बसला, तर ते मृत्यू किंवा विनाशाचे प्रतीक मानले जाते. हे अत्यंत गंभीर वास्तुदोषाचे लक्षण असून यामुळे घराची प्रगती खुंटते.
advertisement
7/7
पक्ष्यांचे संकेत हे केवळ सावध करण्यासाठी असतात. अशा वेळी घाबरून न जाता देवाची उपासना करणे आणि घराची शुद्धी करणे फायदेशीर ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
मोठं संकट येणार… घराबाहेर 'हे' पक्षी दिसले तर अनर्थ घडणार, चुकूनही करू नका 'या' इशाऱ्यांकडे दुर्लक्ष!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल