TRENDING:

महाराष्ट्राचे दादा २९ पालिका सोडून गल्लीतल्या दादांना सिरियस का घेतायत ? अजित दादांना महेश लांडगेंचा सवाल, VIDEO

भाजप आमदार महेश लांडगे यांनी Excusive मुलाखतीमध्ये बोलताना ते म्हणाले, " महाराष्ट्राचे दादा २९ पालिकांच्या निवडणुका सोडून भोसरीत पुर्ण टीम येऊन का बसलेत? गल्लीतल्या दादांना एवढं सिरियस घ्यायची गरज नाही."

Last Updated: Jan 12, 2026, 16:09 IST
Advertisement

नवी मुंबईत पैसे वाटण्याच्या आरोपावरून शिवसेना कार्यकर्त्याला भाजप पदाधिकाऱ्यांनी चोपलं, VIDEO

नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.शिवराम पाटील यांच्या पुतण्याने पैसे वाटल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत. हा व्हीडिओ मनसे नेत्यांनी व्हायरल केला आहे.

Last Updated: Jan 12, 2026, 19:01 IST

'घोषणा करायला बापाचं काय जातंय...', फडणवीसांचा अजित दादांना टोला, VIDEO

देवेंद्र फडणवासांनी पुण्याच्या मुलाखतीमध्ये अजित दादांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "निवडून येता येत नाही तेव्हा काहीही जाहिरनामे काढतो, घोषणा करतात. पुण्यात घोषणा करणार होतो.पुण्यातील महिलांना विमान प्रवास फ्री करणार होतो. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.."

Last Updated: Jan 12, 2026, 18:14 IST
Advertisement

'काय चुक माझी' निष्ठावंत कार्यकर्ता भावुक झाला, भाजपमधून झाली हकालपट्टी , VIDEO

भाजपने नाशिकच्या मुकेश शहाणेंची भाजप मधुन हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातून काढल्यावर ते म्हणाले, "माझं काय चुकलं. माझ्यावर कुठले गुन्हेही नाहीत. मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. मी एकनिष्ठेने राहिलो हिच माझी चुक का, निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिलाय तुम्ही. हेच मला फळ दिलात काय."

Last Updated: Jan 12, 2026, 17:56 IST

एकीकडे मराठीचा गजर, दुसरीकडे सेना-मनसेकडून ठाण्यात इंग्रजीत बॅनर, शिंदेसेना-भाजप तुटून पडली, VIDEO

कालच शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा झाली. त्यात मराठी भाषेचा उल्लेख झालाच. पण आज तीन हात नाका येथे इंग्रजी बॅनर लावल्याने ठाकरे बंधू ट्रोल झाले आहेत. तेव्हा मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले,"एकच बॅनर इंग्रजीमध्ये लावला आहे. बाकीचे ९९ टक्के बॅनर हे माराठीतच लावले आहेत. तो एक बॅनर परिभाषिकांसाठी लावला आहे." त्यावरुन मनसे आणि ठाकरे गट विरोधकांकडून ट्रोल झाला आहे.

Last Updated: Jan 12, 2026, 17:38 IST
Advertisement

ठाकरेंच्या युतीचं पानिपत होणार, नगरपालिका आम्हीच जिंकणार, आठवलेंकडून आधीच निकाल जाहिर, VIDEO

पत्रकारांशी बोलताना आरपीआयचे मंत्री रामदास आठवले म्हणाले, "मुंबई पालिकेत राज ठाकरेंना फायदा होणार नाही. कारण ६० टक्के लोकं परप्रांतिय आणि ४० टक्के मराठी वोटर आहेत. राज ठाकरेंचं पानीपत होणार आहे. त्यामुळे आम्ही बीजेपी, शिवसेना महायुती सोबत येऊन लढत आहोत. त्यामुळे पनवेल आणि मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत."

Last Updated: Jan 12, 2026, 16:57 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
महाराष्ट्राचे दादा २९ पालिका सोडून गल्लीतल्या दादांना सिरियस का घेतायत ? अजित दादांना महेश लांडगेंचा सवाल, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल