विशालने प्रभूला उचललं अन्...
घडलं असं की, घरामध्ये गप्पाटप्पा सुरू असताना विशाल कोटियनने प्रभू शेळकेची मस्करी करायला सुरुवात केली. विशालने चक्क प्रभूला एखाद्या जिममधील डम्बेल्सप्रमाणे हाताने उचललं आणि पुन्हा खाली ठेवलं. प्रभूला विशालची ही शरीरप्रदर्शनाची पद्धत आणि केलेली मस्करी अजिबात आवडली नाही.
advertisement
प्रभूने तात्काळ विशालला टोकलं. तो म्हणाला, "मी काही डम्बेल्स नाही, माझ्यासोबत अशी मजाक करू नका." पण विशालने विषय तिथेच न थांबवता त्याला प्रतिउत्तर दिलं. विशाल म्हणाला, "तू असशील डॉन, पण फक्त नावाने. मी कामाने आहे." इतकंच नाही तर विशालने प्रभूला उडवून लावण्याचे हातवारेही केले.
रडता-रडता प्रभूची कुलदैवतेला साद
विशालचं हे वागणं आणि बोलणं प्रभूच्या जिव्हारी लागलं. जो प्रभू मगाशी सर्वांना हसवत होता, तोच प्रभू घराच्या एका कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागला. रडता-रडता त्याने आपल्या कुलदैवतेला साद घातली, तो म्हणाला, "आई येडामाय माझी साथ दे." नेमकं या दोघांमध्ये काय घडलं आणि विशाल आणि प्रभूमधील हा वाद आता कोणत्या थराला जाणार, हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल.
"आणखी एक सूरज चव्हाण नकोय!" नेटकरी भडकले
प्रभू शेळकेचा हा रडतानाचा प्रोमो पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आश्चर्य म्हणजे, प्रभूला सहानुभूती मिळण्याऐवजी नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, प्रभू मुद्दामहून रडून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. काहींनी असंही म्हटलंय, 'आणखी एक सुरज चव्हाण नकोय. एखाद्या पात्र स्पर्धकाला यंदाचा विजेता बनवा.'
