Green Peas : तुम्ही ही ट्रेन किंवा बस प्रवासात हिरवे वाटाणे विकत घेता? ते मटार नाही तर... 'या' पदार्थामागचं सत्य ऐकून धक्का बसेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण, तुम्हाला माहितीय का की ज्यांना तुम्ही पौष्टिक हिरवे वाटाणे समजून खाताय, ते खरोखर वाटाणे आहेत की रसायनांचा गोळा? नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीने लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
1/7

तुम्ही अनेकदा मीठ लावलेले 'हिरवे वाटाणे' (Green Peas) खाल्ले असणार, अनेकदा लोक ट्रेन प्रवासात हे विकत घेऊन खातात किंवा मग कधी रस्त्यावर विकणाऱ्या एखाद्या दुकानदाराकडुन घेऊन हे खातात, काही लोक याला चकणा म्हणून खातात तर काही लोक स्नॅक्स म्हणून खातात. सहज 10-20 रुपयांच्या पाकिटात मिळणारे हे वाटाणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आवडते 'टाइमपास' खाद्य आहेत.
advertisement
2/7
पण, तुम्हाला माहितीय का की ज्यांना तुम्ही पौष्टिक हिरवे वाटाणे समजून खाताय, ते खरोखर वाटाणे आहेत की रसायनांचा गोळा? नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीने लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
advertisement
3/7
सियालदह आणि कोलकाता परिसरातील बाजारपेठांमध्ये मिळणारे हे हिरवे वाटाणे नैसर्गिक नसतात, तर ते रंगवलेले असतात. एका स्थानिक विक्रेत्याने दिलेल्या कबुलीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की, "एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्सल हिरवे वाटाणे आणायचे कुठून? कारागीर साध्या वाटाण्यांना रंग लावून ते तळून आम्हाला देतात आणि आम्ही ते विकतो." ट्रेनमधील फेरीवाले दररोज अशा वाटाण्यांची शेकडो पाकिटे विकतात, ज्याची किंमत अवघी 5 ते 10 रुपये असते.
advertisement
4/7
कसं ओळखाल खरं आणि खोटं?खऱ्या हिरव्या वाटाण्याचा रंग एवढा गडद नसतो. अस्सल वाटाणे हे शेंगा सुकवून बनवले जातात, त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. मात्र, बाजारात मिळणारे हे स्वस्त वाटाणे प्रत्यक्षात पिवळे वाटाणे असतात. त्यांना आकर्षक बनवण्यासाठी 'इंडस्ट्रियल डाय' (औद्योगिक रंग) वापरला जातो. हे वाटाणे तोंडात टाकताच सहज विरघळतात, कारण ते अतिशय निकृष्ट दर्जाच्या प्रक्रियेतून गेलेले असतात.
advertisement
5/7
एका अंदाजानुसार, जर एक फेरीवाला दिवसाला 4-5 किलो वाटाणे विकत असेल, तर कोलकाता आणि आसपासच्या परिसरात दररोज शेकडो किलो रंगवलेले वाटाणे फस्त केले जात आहेत. चिंतेची बाब म्हणजे, हे वाटाणे लहान मुले अत्यंत आवडीने खातात. ज्या हिरव्या रंगाचा वापर यात केला जातो, तो फूड कलर नसून कपड्यांना किंवा उद्योगात वापरला जाणारा घातक रंग असल्याचे समोर येत आहे.
advertisement
6/7
जादवपुर विद्यापीठाचे संशोधक प्राध्यापक प्रशांत कुमार बिस्वास यांच्या मते, नैसर्गिक हिरव्या वाटाण्यांमध्ये लोह, फॉस्फरस, फोलेट आणि व्हिटॅमिन ए, के, सी मुबलक प्रमाणात असते. ते स्नायूंसाठी फायदेशीर असतात. मात्र, या रंगवलेल्या वाटाण्यांमुळे पचनाचे गंभीर विकार होतात, यामुळे पोट खराब होणे, उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात. कृत्रिम रंगांमुळे शरीरात विषारी घटक जमा होतात.
advertisement
7/7
दीर्घकाळ अशा रसायनांचे सेवन केल्यास कॅन्सर (कर्करोग) सारख्या जीवघेण्या आजाराचा धोका उद्भवू शकतो. पुढच्या वेळी प्रवासात 10 रुपयांचे वाटाणे घेताना विचार करा, तुम्ही भूक भागवत आहात की रोगांना आमंत्रण देत आहात? शक्यतो घरून बनवलेला सुका मेवा किंवा फळे सोबत ठेवणे हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Green Peas : तुम्ही ही ट्रेन किंवा बस प्रवासात हिरवे वाटाणे विकत घेता? ते मटार नाही तर... 'या' पदार्थामागचं सत्य ऐकून धक्का बसेल