Vijay Thalapathy : विजयच्या प्रायवेट जेटचं तासाचं भाडं किती? संपूर्ण दिवसाच्या किंमतीत विकत येईल नवीन लक्झरी कार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विजय सकाळी 11.35 वाजता दिल्लीतील सीबीआय कार्यालयात पोहोचला. प्राथमिक ओळखपत्र तपासणीनंतर त्याला आत सोडण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय अधिकारी विजयकडून या रॅलीचे नियोजन आणि सुरक्षेतील त्रुटींबाबत सविस्तर माहिती घेत आहेत. या चौकशीत अधिकाऱ्यांनी 100 प्रश्नांची प्रश्नावली तयार केल्याची सुत्रांची माहिती आहे.
advertisement
1/6

सामान्य माणूस जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा तो रेल्वे किंवा बसच्या तिकिटाचे दर तपासतो. पण देशातील बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची जीवनशैली सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडची असते, तेव्हा त्याबद्दल चर्चा तर होणारच. सध्या तामिळनाडूच्या राजकारणात 'तावेका' (थावेका) नेता विजयच्या दिल्ली दौऱ्याची अशीच चर्चा रंगली आहे.
advertisement
2/6
27 सप्टेंबर रोजी करूरमधील वेलुचामीपुरम येथे आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली होती. या भीषण घटनेत 41 निष्पाप लोकांचा बळी गेला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सीबीआय (CBI) या प्रकरणाचा तपास करत आहे. याच चौकशीच्या संदर्भात थावेका नेते विजयला सोमवारी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.
advertisement
3/6
विजय सकाळी 11.35 वाजता दिल्लीतील सीबीआय कार्यालयात पोहोचला. प्राथमिक ओळखपत्र तपासणीनंतर त्याला आत सोडण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय अधिकारी विजयकडून या रॅलीचे नियोजन आणि सुरक्षेतील त्रुटींबाबत सविस्तर माहिती घेत आहेत. या चौकशीत अधिकाऱ्यांनी 100 प्रश्नांची प्रश्नावली तयार केल्याची सुत्रांची माहिती आहे.
advertisement
4/6
पण सध्या विजयच्या चौकशीपेक्षाही तो ज्या विमानाने दिल्लीला आला, त्याची चर्चा अधिक होत आहे. विजयने चेन्नई ते दिल्ली प्रवासासाठी 'फ्लाय एसबीएस' कंपनीचे अत्यंत आलिशान 'एम्ब्रेयर लेगेसी 600' (Embraer Legacy 600) हे खासगी विमान भाड्याने घेतले होते.
advertisement
5/6
हे विमान न थांबता 5,500 किलोमीटरचा प्रवास करू शकते. त्यात 13 प्रवासी बसण्याची क्षमता असलेल्या सांगितले जाते, शिवाय या विमानात सर्व आधुनिक सुखसोयी आहेत. विमान तज्ज्ञांच्या मते, या विमानाचे एका तासाचे भाडे 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. विमान प्रवास, वेटिंग आणि एअरपोर्ट पार्किंग चार्जेस मिळून एका दिवसाचा खर्च 20 लाख रुपयांच्या पुढे जातो.
advertisement
6/6
एकीकडे 41 लोकांच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना, दुसरीकडे विजय यांची ही अति-लक्झरी दिल्लीवारी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सीबीआय आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न करते आणि लेखी स्वरूपात नोंदवलेले विजय यांचे जबाब या प्रकरणाला कोणते वळण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vijay Thalapathy : विजयच्या प्रायवेट जेटचं तासाचं भाडं किती? संपूर्ण दिवसाच्या किंमतीत विकत येईल नवीन लक्झरी कार