OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झाल्यात आठ नव्या फिल्म आणि सीरिज, रितेश देशमुखचा हा मूव्ही पाहाच
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Releases This Week : 12 ते 18 जानेवारीदरम्यान ओटीटीवर अनेक नव्या सीरिज आणि फिल्म सीरिज होत आहेत. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
advertisement
1/8

बँक ऑफ भाग्यलक्ष्मी (Bank of Bhagyalakshmi) : 'बँक ऑफ भाग्यलक्ष्मी' ही एक क्राइम कॉमेडी थ्रिलर फिल्म आहे. अभिषेक मंजुनाथने या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. या कन्नड सिनेमात दीक्षित शेट्टी आणि बृंदा आचार्य मुख्य भूमिकेत आहेत. 12 जानेवारीपासून प्रेक्षकांना ही सीरिज प्राईम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
2/8
वन लास्ट एडवेंचर - द मेकिंग ऑफ स्ट्रेंजर थिंग्स 5 (One Last Adventure: The Making of Stranger Things 5) : 'वन लास्ट एडवेंचर - द मेकिंग ऑफ स्ट्रेंजर थिंग्स 5'मध्ये प्रेक्षकांना सीरिजमधील इनसाइड मूव्हमेंट्स पाहायला मिळणार आहेत. 12 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर हे पाहू शकतात.
advertisement
3/8
तस्करी - द स्मगलर्स वेब (Taskaree: The Smuggler's Web) : 'तस्करी-द स्मगलर्स वेब'च्या माध्यमातून इमरान हाशमी ओटीटीवर कमबॅक करत आहे. ही क्राइम-थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना 14 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या सीरिजमध्ये शरद केळकर, अमृता खानविलकर, नंदिश सिंह संधू, अनुराग सिन्हा आणि जोया अफरोज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
4/8
मस्ती 4 (Masti 4) : 'मस्ती 4' ही 2025 मधील बहुचर्चित फिल्म थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. या सीरिजमध्ये रितेश देशमुख, आफताब शिवदासानी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मिलाप जवेरी दिग्दर्शित ही फिल्म प्रेक्षकांना 16 जानेवारीपासून Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.
advertisement
5/8
120 बहादुर (120 Bahadur) : युद्धावर आधारित फरहान अख्तरचा '120 बहादुर' हा सिनेमा 16 जानेवारी 2026 रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. रजनीश घई दिग्दर्शित या फिल्मची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
6/8
भा भा बा (Bha Bha Ba) : दिलीप आणि मोहनलाल स्टार 'भा भा बा' हा सिनेमा थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 16 जानेवारी 2026 रोजी ही फिल्म झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. या फिल्ममध्ये विनीत श्रीनिवासन, ध्यान श्रीनिवासन, रेडिन किंग्सले, सँडी मास्टर आणि बालू वर्गीस हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
7/8
कलमकावल (Kalamkaval) : ममूटी स्टार 'कलमकावल' ही फिल्म 16 जानेवारी 2026 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. जितिन जोश दिग्दर्शित या फिल्मची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
advertisement
8/8
हायजॅक सीझन 2 (Hijack Season 2) : 'हायजॅक सीझन 2' प्रेक्षकांना 16 जानेवारी पासून अॅपल टीव्हीवर पाहायला मिळेल. या सीरिजमध्ये इदरीस एल्बा, नील मास्केल आणि ईव माइल्स हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झाल्यात आठ नव्या फिल्म आणि सीरिज, रितेश देशमुखचा हा मूव्ही पाहाच