TRENDING:

Mumbai Pune Expressway : पुन्हा तोच थरार! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर महाकोंडी; प्रवासाआधी पाहा हे PHOTOS

Last Updated:
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ वाहने अक्षरशः जागेवरच उभी असल्याचे चित्र आहे.
advertisement
1/7
पुन्हा तोच थरार! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा महाकोंडी; प्रवासाआधी हे बघा
मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला असून प्रवाशांना भीषण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खंडाळा बोगद्याजवळ आणि परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
2/7
या कोंडीमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक कमालीची संथ झाली आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ वाहने अक्षरशः जागेवरच उभी असल्याचे चित्र आहे.
advertisement
3/7
हीच स्थिती मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरही पाहायला मिळत आहे. बोगद्याच्या अलीकडे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा मैलोन्‌मैल पसरल्या आहेत.
advertisement
4/7
काही ठिकाणी तर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, तासन्‌तास एकाच जागी अडकून पडल्याने वाहनचालकांचा संयम सुटत चालला आहे.
advertisement
5/7
अवघ्या आठ दिवसांपूर्वी याच मार्गावर तब्बल ३२ तास भीषण वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी प्रवाशांचे अन्न-पाण्यावाचून झालेले हाल अद्याप विस्मरणात गेलेले नाहीत. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
advertisement
6/7
वारंवार होणाऱ्या या कोंडीमुळे महामार्ग पोलीस आणि रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडून कोंडी फोडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
advertisement
7/7
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि शक्य असल्यास जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा (NH4) पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Mumbai Pune Expressway : पुन्हा तोच थरार! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर महाकोंडी; प्रवासाआधी पाहा हे PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल