TRENDING:

पिंपरी-चिंचवडकर आता मोकळा श्वास घ्या! 85 एकरात होतोय ‘ऑक्सिजन पार्क’, नेमका प्लॅन काय?

Last Updated:
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवड शहरात सध्या सुमारे 203 उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. मात्र प्रस्तावित ऑक्सिजन पार्क हा प्रकल्प आधुनिक सुविधा आणि अधिक हरित वातावरण देणारा ठरणार आहे.
advertisement
1/5
पिंपरी-चिंचवडकर मोकळा श्वास घ्या! 85 एकरात होतोय ‘ऑक्सिजन पार्क’, प्लॅन काय?
पिंपरी-चिंचवड शहरात पर्यावरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. निगडी येथील दुर्गादेवी टेकडी परिसरात सुमारे 85 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑक्सिजन पार्क उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. महापौर रखी लांडगे यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या प्रकल्पाचा आराखडा सादर करण्यात आला होता.
advertisement
2/5
निगडी येथील दुर्गादेवी टेकडीचा मोठा परिसर लक्षात घेऊन हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे 85 एकर क्षेत्रावर पसरलेल्या या जागेला पूर्ण विकसित झाल्यानंतर ‘ऑक्सिजन पार्क’ म्हणून ओळख मिळणार आहे.
advertisement
3/5
या प्रकल्पात सुमारे 10 एकर जागेवर स्वतंत्र विशेष विभाग उभारण्यात येणार असून, त्या भागाला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, फिरण्यासाठी पायवाट, सायकल ट्रॅक आणि नागरिकांसाठी हिरवळ तयार करण्याचा विचार आहे.
advertisement
4/5
शहरात वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे हरित क्षेत्र कमी होत आहे आणि हवेची गुणवत्ता घसरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ऑक्सिजन पार्क प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ हवा यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
5/5
शहरात सध्या सुमारे 203 उद्याने नागरिकांसाठी खुली आहेत. मात्र प्रस्तावित ऑक्सिजन पार्क हा प्रकल्प आधुनिक सुविधा आणि अधिक हरित वातावरण देणारा ठरणार आहे.महापौर रवी लांडगे यांनी सांगितले की, शहराचा शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ निगडीच नव्हे, तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी तो लाभदायक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पिंपरी-चिंचवडकर आता मोकळा श्वास घ्या! 85 एकरात होतोय ‘ऑक्सिजन पार्क’, नेमका प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल