PM मोदींचा पुणे दौरा आणि पावसाचा रेड अलर्ट! नागरिकांनो, वाहतूक मार्गात खूप बदल
- Published by:News18 Marathi
- Reported by:PRACHI BALU KEDARI
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून शहरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
advertisement
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौऱ्यावर असतानाच हवामान विभागाकडून महत्त्वाचं अपडेट आलंय. पुण्याला आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये.
advertisement
2/7
पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित दौऱ्यात 3 ठिकाणी भेटी देणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेनंतर पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात ड्रॉप पॉइंट आणि पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती पुणे शहर वाहतूक विभागाकडून देण्यात आलीये.
advertisement
3/7
सावरकर पुतळा चौक ते सारसबाग, पुरम चौक दरम्यान सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. जेधे चौक ते सातारा रस्ता वाहनांसाठी प्रवेश बंद असणार आहे. त्यामुळे टिळक रस्ता व छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी जेधे चौकातून डावीकडे वळण घेऊन सेव्हन लव्हज चौक उजवीकडे वळण जावे. सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक प्रवेश बंद ठेवला आहे. वाहन चालकांनी सेव्हन लव्हज चौक डावीकडे वळण घेऊन वखार महामंडळ उजवीकडे वळून सातारा रस्त्यावरुन इच्छित स्थळी जावे.
advertisement
4/7
कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान दोन्ही बाजूने प्रवेश बंद (रानडे पथ) ठेवण्यात येणार आहे. यावेळी वाहन चालकांनी कामगार पुतळा ते शाहीर अमर शेख चौक मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक सरळ मंगला सिनेमा समोरून काँग्रेस भवन रस्त्यावरून जावे.
advertisement
5/7
शहरातील दांडेकर पूल ते निलायम ब्रीज (सिंहगड मार्गावर), सावरकर पुतळा ते निलायम ब्रीज, न्यू इंग्लिश स्कूल टिळक मार्ग ते विसावा मारुती, सणस पुतळा चौक ते पूरम चौक, स. प. महाविद्यालय प्रवेशद्वार, नाथ पै चौक ते अलका चौक, अलका चौक ते भिडे जंक्शन व व्हीव्हीआयपी पार्किंग हे ड्रॉप पॉईंट निश्चित करण्यात आली आहेत.
advertisement
6/7
पुण्यातील भिडे पूल नदी पात्र, निलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग आणि पीएमपीएल मैदान पूरम चौक या ठिकाणच्या जागा पार्किंगसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मुसळधार पावसाचामुळे पुण्यातील रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यात आजही दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी घराबाहेर पडताना वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती घेऊनच बाहेर पडावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
PM मोदींचा पुणे दौरा आणि पावसाचा रेड अलर्ट! नागरिकांनो, वाहतूक मार्गात खूप बदल