Pune Cold Wave: पुण्यात हाडं गोठवणारी थंडी, पारा 10 अंशांखाली राहण्याचा अंदाज, दिल्लीलाही टाकलं मागे
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Cold Wave: पुणेकरांना यंदाच्या डिसेंबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त गारठ्याचा अनुभव येत आहे. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमान सातत्याने घसरत असून, राजधानी दिल्लीपेक्षाही पुण्यात अधिक थंडीची नोंद होत आहे.
advertisement
1/6

पुणेकरांना यंदाच्या डिसेंबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त गारठ्याचा अनुभव येत आहे. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमान सातत्याने घसरत असून, राजधानी दिल्लीपेक्षाही पुण्यात अधिक थंडीची नोंद होत आहे.
advertisement
2/6
हवामान विभागाच्या नोंदींनुसार, गुरुवारी शिवाजीनगरमध्ये 7.9 तर पाषाणमध्ये 7.7 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान नोंदले गेले. याच दिवशी दिल्लीतील सफदरजंग आणि लोधी रोड येथे तापमान 8.6 अंश सेल्सियस होते. त्यामुळे पुण्यातील थंडी राजधानीपेक्षा अधिक तीव्र भासू लागली आहे.
advertisement
3/6
निरभ्र आकाश, कोरडे हवामान आणि उत्तरेकडून सतत येणारे थंड वारे यांमुळे राज्यभरात थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र तसेच पुणे विभागात रात्रीच्या तापमानात मोठी घसरण दिसत आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. सी. सानप यांनी सांगितले की, सध्या असलेली थंड वाऱ्यांची स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते.
advertisement
4/6
दिल्लीत आणि पुण्यातील तापमानातील फरक जास्त नसला तरी पुण्यातील विशिष्ट ठिकाणी तापमान झपाट्याने घसरले आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीनुसार राज्यात अत्यल्प तापमानात आणखी घट होण्याची शक्यता दिसत नाही. उलट, शनिवारपासून वाऱ्यांच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता असल्याने रात्रीच्या तापमानात किंचित वाढ होऊ शकते.
advertisement
5/6
मात्र, पुण्यात किमान तापमान पुढील चार ते पाच दिवस 10 अंश सेल्सियसपेक्षा कमी राहण्याचा अंदाज कायम आहे. पुण्यातील गेल्या काही दिवसांतील किमान तापमानात लक्षणीय घट आढळून आली आहे. सोमवारी शिवाजीनगरमध्ये 11.3 आणि पाषाणमध्ये 12 अंश सेल्सियस होते. मंगळवारी दोन्ही ठिकाणी तापमान 8 अंशांच्या आसपास नोंदले गेले, तर बुधवारी शिवाजीनगरमध्ये 8.4 आणि पाषाणमध्ये 8.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
advertisement
6/6
गेल्या दहा वर्षांतील डिसेंबरमधील सर्वात कमी तापमान 2018 मध्ये 5.9 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले होते. 2015 मध्ये 6.6 आणि 2023 मध्ये 7.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. यंदा देखील तापमान घसरत असल्याने पुणेकरांना आणखी काही दिवस गारठा सहन करावा लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Cold Wave: पुण्यात हाडं गोठवणारी थंडी, पारा 10 अंशांखाली राहण्याचा अंदाज, दिल्लीलाही टाकलं मागे