मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गावरून जात असताना अचानक एक डिझेलचा टँक पलटी झाल्याने मोठा स्फोट झाला आहे.
डिझेलचा टँकर पलटी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडलं. त्यामुळे रस्त्यावरच आगीचा भडका उडाला. डिझेल सांडल्याने आग तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत पसरली होती. आगीत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. आगीमध्ये कुणी अडकलं आहे का, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. पण, मांजरसुबा घाटामध्ये झालेल्या या भीषण अपघातामुळे एकच घबराट पसरली होती.
advertisement
डिझेल टँकरचा स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. महामार्गावर टँकर पलटी झाल्यामुळे अनेकांनी आपली वाहनं थांबवून माघारी परतले होते. आगीची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपताळीवर सुरू आहे. या घटनामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
