TRENDING:

Road Safety: पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?

Last Updated:

Road Safety: या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गेल्या चार वर्षांत रस्ते अपघातांत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुण्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गेल्या चार वर्षांत रस्ते अपघातांत मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पुणे ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांनी दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
advertisement

विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, शिस्त आणि वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून ‘Secure Horizons in Education 2025’ ही विशेष योजना राबवण्यात येत आहे. ही योजना डिसेंबर 2026 पर्यंत वर्षभर राबवली जाणार आहे. या योजनेविषयी देहू रोड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.

Road Safety: रस्त्यावरचे ‘मृत्यू’ घटले, पुण्यातील संस्थेचं मोठं काम, पाहा काय केलं, Video

advertisement

पोलिसांकडून उपक्रमाद्वारे जनजागृती

View More

देहू रोड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांनी सांगितले की, ‘Secure Horizons in Education 2025’ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सुरक्षितता, शिस्त आणि वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवला जात आहे. वाहतूक सुरक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम घेतला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, वाहतूक नियम, वाहतूक सुरक्षा, महिला सुरक्षा, सायबर फ्रॉड आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले जाते.

advertisement

वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये जाऊन नियमांचे पालन करणाऱ्या नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. तसेच इतर वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. रिक्षा संघटनांना भेट देऊन त्यांनाही वाहतूक नियमांविषयी माहिती दिली जाते.

पुण्यात वर्षभर सुरक्षा कार्यक्रमाचं आयोजन

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली शहरात वर्षभर विविध सुरक्षा कार्यक्रम राबवले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी–फेब्रुवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह, मार्च–एप्रिलमध्ये महिला सुरक्षा कार्यक्रम आयोजित केले जातील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?
सर्व पहा

जून–जुलैमध्ये व्यसन प्रतिबंधासाठी कार्यक्रम घेतले जातील. ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली जाईल. ऑक्टोबरमध्ये सायबर सुरक्षा उपक्रम राबवले जातील. नोव्हेंबरमध्ये संपूर्ण वर्षभराचे कार्यक्रम तपासले जातील आणि चांगले काम करणाऱ्यांचा सन्मानित करण्यात येईल. डिसेंबरमध्ये पुढील वर्षासाठी योजना तयार केली जाईल आणि मार्गदर्शन दिले जाईल.

मराठी बातम्या/पुणे/
Road Safety: पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल