Baramati : अंत्यविधी झाला नव्हता अन् बारामतीच्या प्रसिद्ध हॉटेलवर गुप्त बैठक, चार नेते कोण? अजितदादांच्या मृत्यूनंतर 48 तासात काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Baramati Pawar Family Dispute : अजित पवार यांच्या अंत्यविधीआधीच एक महत्त्वाची बैठक बारामतीच्या एका प्रसिद्ध हॉटेलवर पार पडली होती, अशी माहिती समोर आली आहे.
Baramati NCP Politics (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी सकाळी अपघातात निधन झालं. त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अशातच आज रविवारी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडत आहे. अशातच आता बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून अंत्यविधी होण्यापूर्वीच बारामतीच्या प्रसिद्ध हॉटेलवर गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर 48 तासात राजकीय वर्तुळात बैठकीचा तगदा लावला गेला होता. तर अजित पवार यांच्या अंत्यविधीआधीच एक महत्त्वाची बैठक बारामतीच्या एका प्रसिद्ध हॉटेलवर पार पडली होती, अशी माहिती समोर आली आहे.
बारामतीच्या हॉटेलवर बैठक पार पडली
अंत्यविधी संपताच 4 महत्वाचे नेते बारामतीच्या हॉटेलवर जमले. तिथं त्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. त्यानंतर त्याच रात्री तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला आले. धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढं आणण्यात आलं. अजित पवारांचं अस्तिविसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली होती. याची कल्पना पवार कुटूंबियांना देण्यात आली नव्हती.
advertisement
तातडीने मुंबईला रवाना
सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तिघेही तातडीने मुंबईला रवाना झाले. प्रतिभा पवार यांना याविषयी फोनवरून माहिती देण्यात आली होती. विलिनिकरणासाठी फक्त अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी इतर कुणीही तिथं नव्हतं. बाकी नेत्यांची इच्छा होती की, विलिनिकरण होऊ नये. पार्थ पवार देखील याच मताचे होते. पार्थ पवार यांनी खासगीमध्ये नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
advertisement
शपथविधी लवकरात लवकर व्हावा
दरम्यान, तातडीने शपथविधी करावा आणि सुनेत्रा पवार यांच्या सुत्रं दिली जावी, यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथविधी लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले, असं दिसतंय. अजित पवार गटातील नेत्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादीने एकत्र येणं परवडणारं नाही, याची कल्पना आली असावी. त्यामुळे पवार कुटूंबातील कटुता कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले गेले का? हा देखील मोठा प्रश्न आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 10:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Baramati : अंत्यविधी झाला नव्हता अन् बारामतीच्या प्रसिद्ध हॉटेलवर गुप्त बैठक, चार नेते कोण? अजितदादांच्या मृत्यूनंतर 48 तासात काय घडलं?









