Maghi Purnima 2026: दुधात साखर! माघी पौर्णिमेला शुक्र उदय अन् पुष्य नक्षत्राचा शुभसंयोग; 4 राशींची मौज भारी
- Published by:Ramesh Patil
- Edited by:Ramesh Patil
Last Updated:
Maghi Purnima 2026: माघी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. 2026 सालातील 1 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा असून या दिवशी शुक्र ग्रहाचा उदय देखील होणार आहे. मराठी पंचागानुसार याच दिवशी अत्यंत शुभ मानले जाणारे पुष्य नक्षत्रही असणार आहे.
advertisement
वृषभ राशीच्या लोकांसाठी माघी पौर्णिमेचा दिवस आनंदाची भेट घेऊन येऊ शकतो. तुम्ही दीर्घकाळापासून रोजगाराच्या शोधात असाल, तर पौर्णिमेनंतर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि प्रलंबित असलेल्या योजना तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. यासोबतच तुमच्या आरोग्यातही चांगले बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
कर्क - पौर्णिमेचा चंद्र तुमच्या करिअरमध्ये चमक आणू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती किंवा उत्पन्नात वाढ पाहायला मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर आनंदी राहतील आणि त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. धन-धान्याशी संबंधित असलेल्या समस्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या या राशीच्या विद्यार्थ्यांना यशाचे योग आहेत.
advertisement
तूळ - माघी पौर्णिमेनंतर तुमची सर्जनशीलता अधिक बहरून येईल, ज्यामुळे कला क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. जर तुम्ही गायन, वादन किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित असाल, तर तुमच्या कामाची चर्चा सर्वत्र होईल. सामाजिक स्तरावर तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना आकर्षित करू शकाल. कौटुंबिक जीवनातही तुम्ही चांगला वेळ देऊ शकाल.
advertisement
मकर - माघी पौर्णिमेला पुष्य नक्षत्र आणि शुक्राचा उदय होत असल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची योग्य रणनीती तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळवून देऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठीही कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सुखद बदल पाहायला मिळतील. तुमच्या सहकाऱ्यांना तुमच्या योग्यतेची जाणीव होईल, ज्यामुळे तुमची प्रतिमा अधिक सुधारेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









