दादांचा वारसा वहिनीच चालवणार, उपमुख्यमंत्रीपदानंतर सुनेत्रा पवारांना आणखी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री बनणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास होकार कळवला.
अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री बनणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास होकार कळवला. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पवार कुटुंब देखील तातडीने मुंबईला रवाना झालं आहे. रात्री उशिरा सुनेत्रा पवार आपली दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासमवेत देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या. आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्या तरी त्यांच्याकडे आणखी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. त्यांच्या क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क अशा दोन खात्याची जबाबदारी देखील देण्यात येणार आहे. मात्र अजित पवारांकडे असलेलं वित्त आणि नियोजन हे महत्त्वाचं खातं मात्र भाजपकडे राहणार असल्याची माहिती आहेत. मागील अनेक वर्षांपासून अजित पवार या खात्याचे मंत्री होते. आता त्यांच्या निधनानंतर हे खातं भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती आहे.
advertisement
याशिवाय पक्षाची सगळी सूत्रं देखील सुनेत्रा पवारांकडेच राहणार आहेत. अजितदादांचा उत्तराधिकारी म्हणून पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद देखील त्यांनाच मिळणार असल्याची माहिती आहेत. त्यामुळे आता राज्यातील कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचं, त्यांना बळ देण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवारांसमोर असणार आहे. आता या सगळ्या जबाबदाऱ्या सुनेत्रा पवार कशा सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
खरं तर, यंदाचं आर्थिक बजेट अर्थमंत्री म्हणून अजित पवार सादर करणार होते. तशी त्यांनी तयारी देखील केली होती. ते संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते. पण त्यांच्या अकाली निधनाने बजेट कोण सादर करणार असा प्रश्न होता? पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मी स्वत: त्यात लक्ष घालत असल्याची प्रतिक्रिया देखील फडणवीसांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांचा वारसा वहिनीच चालवणार, उपमुख्यमंत्रीपदानंतर सुनेत्रा पवारांना आणखी दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या









