Magh Purnima 2026: फेब्रुवारीची 1 तारीख विसरू नका; न समजणाऱ्या अडचणींमधून सुटण्यासाठी माघी पौर्णिमा..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Magh Purnima 2026: माघी पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास शनी ग्रहाची वक्रदृष्टी आणि महादशेचा प्रभाव कमी होऊ शकतो. जीवनातील अडचणी दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी या दिवशी..
मुंबई : काही गोष्टींचे आकलन आपल्या क्षमतेच्या पलिकडे असते. जीवनात येणाऱ्या काही अडचणी अशा असतात, त्यापुढे आपण हतबल होऊन जातो. काय करावे काही सूचत नाही. आपल्याकडे हिंदू धर्मात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गरजू व्यक्तींना दान केल्याने जीवनातील पापांचे क्षालन होते आणि संकटांचा अंत होतो, असे मानले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्यास शनी ग्रहाची वक्रदृष्टी आणि महादशेचा प्रभाव कमी होऊ शकतो. जीवनातील अडचणी दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी या दिवशी कोणत्या 3 गोष्टींचे दान करावे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
माघ पौर्णिमेला काळ्या तिळांचे दान - एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत शनीची महादशा किंवा साडेसाती सुरू असते, तेव्हा त्याच्या जीवनातील अडचणी वाढू लागतात. मन अशांत राहते आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही. अशा स्थितीत माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र स्नान करून काळ्या तिळांचे दान करावे. या दानामुळे आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि कामातील अडथळे दूर होतात.
advertisement
माघ पौर्णिमेला गुळाचे दान - माघी पौर्णिमेच्या दिवशी निर्मळ मनाने गुळाचे दान केल्यास त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात. या दानामुळे समाजात मान-सन्मानाची कमतरता भासत नाही. तसेच शनीच्या महादशेची तीव्रता कमी होऊ लागते. शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो आणि मनातील भीती किंवा चिंता दूर होण्यास मदत होते.
माघ पौर्णिमेला मोहरीच्या तेलाचे दान - माघी पौर्णिमेच्या तिथीला जर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा शनी देवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचे दान केले, तर आयुष्यातील समस्यांवर उपाय मिळू लागतात. या दानामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते आणि शनी देवाच्या कृपेने कठीण कामे मार्गी लागतात, असे मानले जाते.
advertisement
माघ पौर्णिमेला दान करण्याचे एकंदरीत लाभ काय आहेत?
माघ पौर्णिमेला या 3 गोष्टींचे दान केल्यामुळे शनीच्या क्रूर दृष्टीचा प्रभाव कमीत कमी राहतो. यामुळे मनातील अस्वस्थता आणि बेचैनी दूर होते. जे लोक कठोर परिश्रम करतात त्यांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळण्यास सुरुवात होते आणि संपूर्ण आयुष्यात सकारात्मकतेचा संचार होतो.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:35 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Magh Purnima 2026: फेब्रुवारीची 1 तारीख विसरू नका; न समजणाऱ्या अडचणींमधून सुटण्यासाठी माघी पौर्णिमा..









