advertisement

हृदय उजवीकडे अन् जन्मापासून दुर्मीळ आजार, अभिनयानं जिंकली मनं, दिग्गज अभिनेत्रीचं दुर्मीळ आजारानं निधन

Last Updated:

Catherine O'Hara यांचे लॉस एंजेलिस येथे निधन झाले. Home Alone, Schitt's Creek मधून प्रसिद्ध झालेल्या कॅथरीन या दुर्मिळ डेक्स्ट्रोकार्डिया आजाराशी झुंज देत सक्रिय होत्या.

News18
News18
पडद्यावर विनोद करुन लोकांना हसवून जग जिंकणाऱ्या एका हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख आज जगासमोर आलं, पण तो चेहरा आता कायमचा शांत झाला. 'होम अलोन'मध्ये केविनला शोधणारी ती काळजीपोटी व्याकुळ झालेली आई आजही आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते, पण सर्वांची लाडकी ही 'मॅकलॅस्टर मॉम' आता कधीच कुठल्याच नव्या भूमिकेत दिसणार नाही. अनेक प्रोजेक्ट अर्धवट सोडून हॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅथरीन ओ’हारा यांचं निधन झालं.
ज्या हृदयाने कोट्यवधी प्रेक्षकांना प्रेम दिलं, ते हृदय जन्मापासूनच शरीराच्या विरुद्ध दिशेला होतं. एक असा दुर्मिळ आजार ज्याने त्यांना आयुष्यभर साथ दिली, पण त्यांनी कधीच आपली जिद्द सोडली नाही. वयाच्या ७१ व्या वर्षी, जेव्हा त्या अजूनही नवीन स्वप्नं रंगवत होत्या, तेव्हाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आज त्यांचं घर आणि हॉलिवूडचं अंगण पोरकं झालंय. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीतील वेगळी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही.
advertisement
होम अलोन या लोकप्रिय चित्रपटात केविनच्या आईची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडियन कॅथरीन ओ’हारा (Catherine O'Hara) यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. ७१ व्या वर्षी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 'शिट्स क्रीक' (Schitt's Creek) सारख्या मालिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कॅथरीन यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
advertisement
काय होती प्रकृतीची स्थिती?
कॅथरीन यांच्या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. मात्र, त्यांच्या आजाराचे स्वरूप गुप्त ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या वयातही त्या सिनेसृष्टीत सक्रिय होत्या आणि अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत होत्या. याच महिन्यात पार पडलेल्या 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स'मध्ये त्यांना नामांकन मिळाले होते, मात्र प्रकृतीमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.
advertisement
दुर्मिळ आजाराशी झुंज: हृदय होतं विरुद्ध दिशेला!
कॅथरीन ओ’हारा यांनी एका मुलाखतीत आपल्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांना जन्मापासूनच डेक्स्ट्रोकार्डिया  नावाचा एक अतिशय दुर्मिळ आजार होता. या स्थितीत व्यक्तीचे हृदय आणि शरीराचे इतर अवयव सामान्य माणसाच्या तुलनेत उलट दिशेला असतात. जगात १० लाख लोकांमध्ये केवळ ८-१० जणांनाच हा आजार असतो. तरीही त्यांनी कधीही या आजाराला आपल्या कामाच्या आड येऊ दिले नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
हृदय उजवीकडे अन् जन्मापासून दुर्मीळ आजार, अभिनयानं जिंकली मनं, दिग्गज अभिनेत्रीचं दुर्मीळ आजारानं निधन
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement