मोठा खुलासा! 17 जानेवारीची 'ती' गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्लॅन; Exclusive व्हिडिओ समोर
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
निधनापूर्वी अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. 17 जानेवारीला यासंदर्भात झालेल्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचं विलीनीकरण होणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची धुरा कुणाकडे जाणार? याबाबत अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहेत. मात्र, निधनापूर्वी अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आता समोर आली आहे. 17 जानेवारीला यासंदर्भात झालेल्या बैठकीत विलीनीकरणावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांनीच १२ तारीख ठरवलीली होती असंही शरद पवारांनी सांगितलं. आता विलिनीकरणाच्या चर्चेसाठी झालेल्या बैठकीचा व्हिडीओ समोर आला आहे. १७ जानेवारीला गोविंदबागेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याची चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विलीनीकरणाची चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चेसाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. दोन राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात ही दादांची इच्छा होती. 12 तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता. कोर्टातली केसही मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवारांच्या निधनांतर आता विलीनीकरणाच्या चर्चेत आता खंड पडलेला दिसतोय.
advertisement
राष्ट्रवादीच्या विलीनिकरणाची चर्चा करण्यासाठी झालेल्या या बैठकीत कोण-कोण उपस्थित होतं, त्याचा व्हिडिओही आता समोर आला आहे. तसंच अजित पवारांची विलीनीकरणाची ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी पवार कुटुंबियांचा पाठिंबा?
अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी कोणताही संपर्क किंवा संवाद झाला नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. कुटुंबातल्या कुणाशीही संवाद न साधता त्या थेट मुंबईत आल्या, आज त्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांच्या पक्षाची धुरा त्यांच्या अकाली निधनानंतर आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 10:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मोठा खुलासा! 17 जानेवारीची 'ती' गुप्त बैठक अन् राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्लॅन; Exclusive व्हिडिओ समोर









